एक्स्प्लोर

Ahmednagar Hospital Fire : इमारत नवी, वायरिंगही नवं, मग आग लागली कशी? हादरवणारी कहाणी!

Ahmednagar Hospital Fire : ऐन दिवाळीत हे भीषण अग्नितांडव झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याने, दहा कुटुंब अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Ahmednagar collector Rajendra Bhosale) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. आज शनिवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये (Ahmednagar Fire) अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळ सणांमध्ये घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

ऐन दिवाळीत हे भीषण अग्नितांडव झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याने, दहा कुटुंब अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची इमारत दीड-दोन वर्ष जुनी आहे. त्यामुळे वायरिंग आणि इमारत नवीन असताना अशी घटना कशी घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होतो. 

भयावह अन् भीषण आग  
रुग्णालयाला आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून मन सुन्न होतं. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतेय. याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे. 

हसन मुश्रीफ तातडीने नगरला रवाना 
या दुर्घटनेची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तात्काळ घटनास्थळी रवाना होत आहे. हसन मुश्रीफ हे सध्या कोल्हापुरात आहेत. "मला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले. त्यांनी रुग्णालयाला आग लागल्याची माहिती दिली. मी आता तात्काळ जाऊन माहिती घेईन. नेमकं काय घडलं हे तिथे गेल्यावर कळेल. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करुच, पण दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना सरकारकडून मदतही दिली जाईल. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.  

ICU मध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ -
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाच्या ICU मध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईत अनेक रुग्णालयात ICU मध्ये आग लागल्याच्या घटना काही दिवसापूर्वी घडल्या होत्या. शिवाय विरार, पालघरमध्ये अशाप्रकारच्याच घटना घडल्या होत्या. विरार येथील रुग्णालयात 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नागपूर 9 एप्रिल रोजी वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. या सर्व भीषण घटना एप्रिल 2021 मध्ये घडल्या होत्या.  

VIDEO : अहमदनगरमध्ये रुग्णालयात भीषण आग -

संबंधित बातम्या  

Ahmednagar District Hospital Fire: अहमदनगरमध्ये अग्नितांडव, जिल्हा रुग्णालयातील ICUला भीषण आग, 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू  

कधी आग, कधी वायुगळती! कोरोना काळात रुग्णालयातील दुर्घटनांमध्ये राज्यात शेकडो निष्पापांचे बळी; जबाबदार कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget