धक्कादायक! शिर्डीत भरचौकात तरुणावर धारदार शस्त्रान वार, हल्ल्यात तरुण जखमी, गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
शिर्डीत धक्कादायक घटना घडली आहे. भरचौकात तरुणावर धारदार शस्त्रान वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar Shirdi News : शिर्डीत (Shirdi) धक्कादायक घटना घडली आहे. भरचौकात तरुणावर धारदार शस्त्रान वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाला उपचारासाठी आधी साई संस्थानच्या रुग्णालयात (Sai Sansthan hospital) आणि नंतर नाशिक (Nashik) येथे हलवण्यात आले आहे. निरज चौधरी (Neeraj Chaudhary) असे जखमी युवकाचे नाव आहे.
शिर्डीतील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे
भरचौकात तरुणावर धारदार शस्त्रान वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. यामुळं शिर्डीतील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या हल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेमुळं शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटने प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. नेमका हा हल्ला का करण्यात आला याचा तपास पोलीस प्रशासन घेत आहे.
तुळजापूर हाणामारी प्रकरण, आठ आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल
धाराशिव तुळजापूर येथील गोळीबार व कोयत्याने हाणामारी प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आठ आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. कुलदीप मगर हा तरुण कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता. या तरुणाच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल झाले आहेत. सुरज साठे, चेतन शिंदे याने गोळीबार केला आहे. तर सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे ,नंदू गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी या आरोपीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार का केला? तुला उचलून त्यांच्या हवाली करत त्यांच्यासमोर संपवायचे आहे म्हणून मारहाण केली आहे. कुलदीप मगरच्या फिर्यादीत ड्रग्ज मापिया विनोद पिंटू गंगणे याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तर आठ आरोपीवर पोलिसांनी दहशत माजवणे फायरिंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद
करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कामावरुन विनोद पिंटू गंगणे व ऋषी मगर यांच्या वाद झाला होता
काल रस्त्याच्या कामावरुन विनोद पिंटू गंगणे व ऋषी मगर यांच्या वाद झाला होता. या वादाचे रुपांतर फायरिंग व मारहाणीत झाले आहे. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर इतर आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी याबाबतची माहिती दिली.























