हिंदुत्ववावर बोलत असल्याने किर्तनात गोंधळ, महाराजांना धक्काबुक्कीचा प्रयत्न; आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावात किर्तनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. या किर्तनात महाराजांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आहे.
Ahilyanagar : संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावात किर्तनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. या किर्तनात महाराजांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आहे. गमनेर हरिनाम सप्ताह निमित्ताने दररोज किर्तन सुरु असते. या किर्तनात राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. कीर्तन सुरू असताना हिंदुत्वावर बोलत असल्याने कीर्तन रोखले होते. याप्रकरणी चार जणांसह अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चारचाकी वाहनाचे देखील नुकसान केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. गोंधळ झाल्यानंतर संग्राम महाराज कीर्तन अर्ध्यावर बंद पडल्याचं पाहायला मिळालं. काल रात्री ही घटना घडल्यानंतर आज दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. धक्काबुक्की करणारे स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
काल रात्री नऊच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने कीर्तनाला सुरुवात झाली होती. मात्र सुरुवातीच्या अभंगानंतर कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी देशातील विविध घडामोडींवर भाष्य करताना हिंदूत्वावर भर द्यायला सुरुवात केली. त्यानंतर श्रोत्यांमध्ये बसलेल्या काहींना ते टोचले. त्यातून अभंगाचे निरुपण करा महाराज अशा काही जणांमध्ये चर्चा सुरु झाली. दबक्या आवाजातील चर्चेला वाचा फोडीत निलेश गायकवाड यांनी त्यावर उघड भाष्य केले. त्यातून महाराज आणि गायकवाड यांच्यात शाब्दीक फेकाफेक झाल्याने वातावरण तापले. त्यातूनच सप्ताहाचे आयोजक आणि गायकवाडांसह त्यांच्या आठ ते दहा समर्थकांमध्ये हमरीतुमरी होवून गोंधळ उडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!























