एक्स्प्लोर

कृषी विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश होणार; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती 

शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे असं राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

मुंबई: कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (25 एप्रिल) रोजी शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आज सुपूर्त केला. त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये कृषी विषयाचे धडे पाहायला मिळणार आहे.

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. तर हा निर्णय झाल्यास कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी सत्तार यांनी व्यक्त केला. 

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तर शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

बैठकीत यांची उपस्थिती

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषी) बाळासाहेब रासकर, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू;  2 गंभीर जखमी
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?
पीएम किसानचे 2000 रुपये 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार, रक्कम खात्यात जमा न झाल्यास काय करावं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ankush Kakde on Sanjay Raut : संजय राऊतांचं शरद पवारांवर वक्तव्य.... अंकूश काकडे म्हणतात...ABP Majha Headlines : 02 PM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAshok Harnawal on Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंवर बोलू नका, अन्यथा कुंडली बाहेर काढूVinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू;  2 गंभीर जखमी
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?
पीएम किसानचे 2000 रुपये 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार, रक्कम खात्यात जमा न झाल्यास काय करावं?
Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
Neelam Gorhe & Sanjay Raut: नीलम गोऱ्हेंच्या चिखलफेकीची जबाबदारी शरद पवारांचीही, राऊतांचा हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया
नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने आगडोंब उसळला, राऊतांचा हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
Embed widget