एक्स्प्लोर

Supriya Sule : राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्या; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी 

महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय. 

Supriya Sule : राज्यात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस पडताना दिसत नाही. हातची पीकं वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यासंदर्भातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Ncp MP Supriya Sule) यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. 

राज्यातील अनेक जिल्हे तहानलेले

सुप्रिया सुळेंनी राज्यातील पावासाच्या स्थितीबाबत ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आमि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळं राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. राज्यात 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. पावसाअभावी शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक असल्याची सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा असे त्या म्हणाल्या. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळाची कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sangli News: जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, सत्ताधारी भाजपकडून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: वादळी वाऱ्यात शरद पवारांचं भाषण; व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली
Video: वादळी वाऱ्यात शरद पवारांचं भाषण; व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला
मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला
Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही
Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही
Jayant Patil : मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली : जयंत पाटील
मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली : जयंत पाटील
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाहीShantigiri Maharaj Prachar : सायकलवरून प्रवास करत शांतिगिरी महाराजांनी शोधला प्रचाराचा नवा फंडाABP Majha Headlines : 02 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Bag Checking : आरोप झाल्यावर तपासणी, उपयोग काय ? अंबादास दानवेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: वादळी वाऱ्यात शरद पवारांचं भाषण; व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली
Video: वादळी वाऱ्यात शरद पवारांचं भाषण; व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला
मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला
Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही
Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही
Jayant Patil : मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली : जयंत पाटील
मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली : जयंत पाटील
Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये मोठा ट्विस्ट; ओवीवर कोणी हल्ला केला, याचं कोडं  उलगडणार
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये मोठा ट्विस्ट; ओवीवर कोणी हल्ला केला, याचं कोडं उलगडणार
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध; भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्याने मारहाण
अहमदनगर शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध; भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्याने मारहाण
CM Eknath Shinde Nashik : विकास , विकास आणि विकास यावरच मतदार मत देणार; एकनाथ शिंदे EXCLUSIVE
CM Eknath Shinde Nashik : विकास , विकास आणि विकास यावरच मतदार मत देणार; एकनाथ शिंदे EXCLUSIVE
सोलापूरकरांसाठी गुडन्यूज... उजनीतून पंढरीत पोहोचलं पाणी, दुथडी वाहू लागली चंद्रभागा
सोलापूरकरांसाठी गुडन्यूज... उजनीतून पंढरीत पोहोचलं पाणी, दुथडी वाहू लागली चंद्रभागा
Embed widget