TET Exam : दोन वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन, 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा
शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली आहे.
![TET Exam : दोन वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन, 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा After two years, the Teacher Eligibility Test will be held from September 15 to December 31 TET Exam : दोन वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन, 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/03/c4b0720714f7e1dbdebd9405edabd36c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षाचे (TET) आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षानंतर 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे
शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या काळात होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन 2018-19 नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे. 2019 साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर 2020 साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवडयात 6100 शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)