एक्स्प्लोर
पुण्यात दोन वर्षीय मुलाची हत्या करुन आईची आत्महत्या
जान्हवी कांबळे यांनी त्यांचा दोन वर्षीय मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या बायकोने दोन वर्षाच्या मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जान्हवी कांबळे आणि शिवांश कांबळे असे या मायलेकाचे नाव आहे. घरगुती कलहातून हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. हडपसर पोलीस स्थानकात जान्हवी कांबळे यांचे पती अमित कांबळे कार्यरत आहेत. ते रात्रपाळीच्या ड्यूटीवर गेले असता ही घटना घडली आहे. जान्हवी कांबळे यांनी त्यांचा दोन वर्षीय मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जान्हवी कांबळे यांच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. जान्हवी कांबळे यांचे पती आणि सासरे हे पोलीस दलात नोकरीला आहेत. तसेच सासू नेहमी त्रास देत असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.
आणखी वाचा























