एक्स्प्लोर

ड्रग्जनंतर एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा विधिमंडळात; किराणा दुकानातून पेरलं जातंय घातक द्रव्य; सभापतींनी दिले महत्त्वाचे आदेश

जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : ड्रग्जप्रकरणावरुन विधिमंडळात अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. तर, गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या, गल्लीतल्या किराणा दुकानाही मिळणाऱ्या एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा आता विधिमंडळ अधिवेशनात चर्चेत आला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी आज सभागृहात लहान मुले आणि विद्यार्थ्यां यांच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.राज्य सरकारने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली असताना किरणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिक हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त करत येत्या 15 दिवसांत बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री आणि प्रशासनाला दिले.

जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात 500 मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले. राज्यातील नाशिक मुंबईसह सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) तसेच नशेच्या गोळ्या बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कॅफेनयुक्त पेयांचा (एनर्जी ड्रिंक्स) प्रसार केला जातो. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील सरकारने बंदी घालावी तसेच शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.  
 
आ. सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात 15 दिवसाच्या आत बैठक घ्यावी. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील काही आक्षेपार्ह असल्यास अधिकाऱ्यांना सांगून कायदेशीर कारवाई करावी, असे सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शाळा परिसरात 500 मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांवर (एनर्जी ड्रिंक्स) तातडीने बंदी घालण्यात येईल. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम कोणते?

एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारे कॅफेन शरीराला अत्यंत घातक
कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो. 
अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.

वय वर्ष 18 खालील मुलांसाठी विक्री नाही

स्टिंग आणि आणि इतर काही एनर्जी ड्रिंक्सची किरण मालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वस्तूता हे एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट वयातील मुलांना याची विक्री करतात. अनेक पालकांमध्ये देखील याबाबत जागरूकता नसल्याने आढळून आल्याने विक्रीचे प्रमाण अधिक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget