𝗗𝗶𝗮𝗹 𝟭𝟭𝟮: डायल 112 मध्ये आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही समावेश
डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे.
Maharashtra Dial 112 : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले.
राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे 2.50 लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज 19 हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर 2800 तक्रारींचा निपटारा केला जातो.
𝗔𝗳𝘁𝗲𝗿 𝗗𝗶𝗮𝗹 𝟭𝟭𝟮, 𝗻𝗼𝘄 𝘆𝗼𝘂 𝗰𝗮𝗻 𝗿𝗲𝗮𝗰𝗵 𝗼𝘂𝘁 𝘁𝗼 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝘂𝘀𝗶𝗻𝗴 𝘀𝗼𝗰𝗶𝗮𝗹 𝗺𝗲𝗱𝗶𝗮 𝗽𝗹𝗮𝘁𝗳𝗼𝗿𝗺𝘀 𝘁𝗼𝗼!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 14, 2023
Launched Maharashtra Emergency Response Team (MERS) - Dial 112 social media integration project,this morning. pic.twitter.com/3fH1BAor2Q
त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना
आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप इत्यादी माध्यमातून येणार्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणार्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे.
112 महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स
112 महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असून, अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात, तातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्यातील गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्था बाबत वरिष्ठ #पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेचे आयोजन आणि सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कारांचे वितरण@MahaDGIPR @DGPMaharashtra pic.twitter.com/9xSQ1PYnTf
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) January 14, 2023
ही बातमी देखील वाचा