(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : दसऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूने गाठल्यानंतर आता दिवाळीला जयंत पाटील सुद्धा डेंग्यूग्रस्त!
डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन, अशी माहिती ट्विट करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील डेंग्यू झाल्याची माहिती ट्विट करून देताना रिपोर्ट पोस्ट केला आहे. त्यामुळे भर दिवाळीत जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, दसऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटले असतानाच डेंग्यूग्रस्त झाल्याने त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. डेंग्यू बरा झाल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन. pic.twitter.com/AkkQGS5zhM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 14, 2023
जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.
शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
दुसरीकडे, डेंग्यूपासून दिलासा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवा यांनी काका शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शहा आणि अजित यांच्या भेटीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. अजित पवार शरद पवार यांना एकटे भेटले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेट दिवाळीच्या सेलिब्रेशनबाबत होती. मात्र, अजितच्या एक दिवस आधी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. यावर सुप्रिया यांनी कोणतेही उत्तर दिलेलं नव्हतं.
अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप
दुसरीकडे, अजित पवार राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर सर्वकाही आलबेल असल्याची वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय आहे. याचबाबत राजकीय वर्तुळात अजित पवार गट सध्या नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमित दर मंगळवार आठवडा आमदार बैठक होणार आहे. मागील तीन आठवडे अजित पवार मात्र या बैठकीस उपस्थितीत नव्हते. अजित पवार गटात विकास निधी वाटपावरुन नाराजीचा सूर आहे. यावरच या बैठकीत चर्चा होणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांच्या देवगिरी बंगला येथे 21 तारखेला मंगळवारी बैठक पार पडणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या