एक्स्प्लोर
तब्बल 23 वर्षांनी 40 वर्षांचा विद्यार्थी दहावी पास झाला...
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस काहीही करु शकतो. सांगलीच्या झरे गावात याचाच प्रत्यय आला आहे.
सांगली : मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस काहीही करु शकतो. सांगलीच्या झरे गावात याचाच प्रत्यय आला आहे. झरे गावातील राजेश पवार तब्बल 23 वर्ष प्रयत्न केल्यानंतर दहावी पास झाले आहेत. त्यांना 57% गुण मिळाले आहेत. त्यांच्या जिद्दीची तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील राजेश संभाजी पवार तब्बल 23 वर्षांनी दहावी पास झाले आहेत. 57% गुण मिळवून ते पास झाले आहेत. राजेश हे हिंगणी (ता खटाव) या गावचे आहेत. 1994 मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परंतु सहापैकी एकाच विषयात ते उत्तीर्ण झाले तर पाच विषयात अनुत्तीर्ण झाले.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पवार पुन्हा परीक्षेला बसले नाहीत. पवार सध्या झरे येथे इलेक्ट्रनिकचा छोटा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी इयत्ता 11 वी पास होऊन बारावीत प्रवेश घेत आहे. मुलगी 11 वीची परीक्षा देत होती तर वडील दहावीच्या परीक्षेला बसले होते.
दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाबाबत राजेश म्हणाले की, "मी दहावी नापास आहे, ही गोष्ठ मनात घर करून राहिली होती. दोन वर्षांपासून दहावी पास व्हायचे मनात होते. त्यामुळे यंदा प्रवेश घेतला आणि आभ्यास केला. उत्तीर्णसुद्धा झालो. आज मी भरपूर खूश आहे."
VIDEO | 'शेम टू शेम' भावंडांचे 'शेम टू शेम' गुण | वायरल चेक | एबीपी माझा
राजेश म्हणाले की, "मी प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा बरेच जन मला म्हणाले, कशाला या भानगडीत पडतोस? परीक्षेला गेल्यावर सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी माझ्याकडे बघून हसायचे, परंतु मी धीर सोडला नाही. अखेर मी दहावी पास झालो. आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे."
राजेश यांची मुलगी आरती म्हणाली की, "आमचे बाबा खूप जिद्दी आहेत. ते दहावी नापास झाले होते. परंतु ते यावर्षी दहावीला बसले. काम सांभाळून अभ्यास करायचे. या वयातही त्यांनी अभ्यास पूर्ण केला आणि परीक्षा पासही झाले. त्यामुळे आम्ही खूप खूश आहोत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement