एक्स्प्लोर
Advertisement
कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?
मुंबई : गुंडांना उमेदवारी दिली म्हणून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण एडीआरच्या अहवालानुसार राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार देण्यात एकही पक्ष मागे नसल्याचं चित्र आहे. एडीआरने राज्यातील 7 महापालिकांच्या उमेदवारांची पडताळणी केली. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या रिंगणात 1641 पैकी 216 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 154 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पहिल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय मनसे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
शिवसेनेच्या 173 पैकी 41 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे असल्याचं आढळून आलं आहे. तर 28 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसच्या 171 पैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मनसेच्या 154 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. तर 22 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
भाजपच्या 151 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 14 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रवादीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात मागे नाही. मुंबईत राष्ट्रवादीच्या 132 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ठाणे महापालिका :
ठाण्यात सगळ्यात जास्त मनसेने गुन्हेगारांना तिकीटं दिली आहेत. मनसेच्या 86 पैकी 20 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर शिवसेनेच्या 96 पैकी 20 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रवादीचे 71 पैकी 23 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी 12 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
नागपूर महापालिका :
भाजपच्या 118 पैकी 17 उमेदवारांवर किरकोळ स्वरुपाचे तर, 9 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या 101 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांवर किरकोळ, तर 10 जणांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
सोलापूर महापालिका :
सोलापुरात राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या उमेदवारांवर सर्वाधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीच्या 41 उमेदवारांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी 15 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर एमआयएमच्या 26 पैकी 15 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
उल्हासनगर महापालिका :
उल्हासनगरमध्ये भाजपने सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याचं चित्र आहे. भाजपच्या 54 उमेदवारांपैकी 12 जणांवर किरकोळ, तर 9 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर इतर पक्षांनीही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिले आहेत.
अकोला महापालिका :
अकोल्यात राष्ट्रवादीच्या 58 पैकी 11 जणांवर किरकोळ स्वरुपाचे, तर 10 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर भाजपच्या 47 पैकी 7 उमेदवारांवर किरकोळ स्वरुपाचे, तर 6 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
अमरावती महापालिका :
अमरावतीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिले आहेत. काँग्रेसच्या 63 पैकी 7 उमेदवारांवर किरकोळ स्वरुपाचे, तर 6 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement