एक्स्प्लोर

अनोखा 'प्यार'! चंद्रपूरच्या 'प्यार फाउंडेशन'चं कौतुकास्पद पाऊल, उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जाऊन कुत्र्याचा वाचवला जीव

उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जाऊन चंद्रपूरच्या "प्यार फाउंडेशन" नावाच्या एका प्राणीमित्र संस्थेने कुत्र्याचा जीव वाचविल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

चंद्रपूर : उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जाऊन चंद्रपूरच्या "प्यार फाउंडेशन" नावाच्या एका प्राणीमित्र संस्थेने कुत्र्याचा जीव वाचविल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यासाठी प्यार फाउंडेशनचे 2 कार्यकर्ते विमानाने उत्तरप्रदेशला गेले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी कुत्र्याचा जीव वाचवला. या जखमी कुत्र्याला स्थानिक पातळीवर कुठलीच मदत मिळत नसल्यामुळे प्यार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. 

गोरखपूरच्या पांडुरणा शहरात एका कुत्राच्या शरीरात काही अज्ञात आरोपींनी तलवार घुसवली होती. उपचाराविना हा कुत्रा गेल्या 10-12 दिवसांपासून शहरात फिरत होता. काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी या कुत्र्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवारीने वार केले. सुदैवाने ही तलवार पोट किंवा छातीच्या आरपार न गेल्या त्याचा जीव गेला नाही पण अतिशय गंभीर अवस्थेत हा कुत्रा तेव्हापासून शहरात फिरत होता. 

पांडुरना शहरातील काही प्राणी मित्रांनी याबाबत व्हॉट्सअॅप अभियान चालविले होते आणि याबाबतची एक पोस्ट व्हॉट्सअॅप वर व्हायरल झाली होती. मात्र या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे कुत्र्याची ही करुण अवस्था पाहून प्यार फाउंडेशनच्या कुणाल महल्ले आणि अर्पित सिंग ठाकूर या 2 कार्यकर्त्यांनी विमानाने पोहोचत उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील पांडुरना हे शहर गाठले. 

त्यानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाची मदत घेत प्यार फाउंडेशनच्या या २ कार्यकर्त्यांनी या कुत्र्याला हुडकून काढले आणि त्याच्या शरीरातील तलवार बाहेर काढून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनला जवळपास 18 तासांचा वेळ खर्ची झाला असून या कामात त्यांना स्थानिक महापौर श्री जैस्वाल आणि पोलिसांची मोलाची मदत झाली.

सध्या हा मुका जीव सुखरूप असल्याची माहिती प्यार फाउंडेशनचे संस्थापक देवेन्द्र रापेल्ली यांनी दिली आहे. या कुत्र्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला आणले जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर ते उत्तरप्रदेशातील पांडुरना गाठत एका जखमी कुत्र्याचे प्राण वाचविणाऱ्या या प्यार फाउंडेशनच्या चमुचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Job Majha : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 20 April 2024Sharad Pawar vs Ajit Pawar : कचाकचा...कचाकचा.. लढत दोघींमध्ये, वाक् युद्ध दोघांमध्येDevendra Fadnavis vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, वादाची मिरची;ठाकरे-फडणवीस आमनेसमानेPune Unseasoanl Rian : रिमझीम पावसामुळे  पुणेकरांना दिलासा, दुपारपासून पुण्यात रिमझीम पावसाच्या सरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!
ट्रेविस हेड-अभिषेक शर्मानं रचला इतिहास, दिल्लीच्या बॉलर्सचा पॉवरप्लेमध्ये पालापाचोळा
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Embed widget