Ketaki Chitale Case : केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपणार; अडचणी वाढणार?
Ketaki Chitale Case Update : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य पोस्ट प्रकरणी अटकेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपणार आहे.
Ketaki Chitale Case Update : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे (Ketaki Chitale) सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. आज तिची पोलीस कोठडी आज संपणार आहे. मागील सुनावणीवेळी केतकीनं वकील घेतला नव्हता. तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तिनं केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयानं केतकीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
केतकी चितळेनं फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह , बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट लिहिली होती. तसंच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून तिला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे.
मी पोस्ट डिलीट करणार नाही, केतकीचा युक्तीवाद
केतकीनं कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला होता. केतकीनं सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं होतं.
केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल?
अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.