Narayan Rane Sindhudurg Bungalow : नारायण राणेंच्या आणखी एका बंगल्यावर कारवाई? सिंधुदुर्गमध्ये समुद्रकिनारी आहे नीलरत्न बंगला
Narayan Rane Sindhudurg Bungalow :
Narayan Rane Sindhudurg Bungalow : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईमधील जुहू (Mumbai Juhu) येथील अधीश बंगल्याची मुंबई महापालिकेच्या (BMC) पथकाकडून पाहणी करण्यात आली. अधीश बंगल्यात अनियमिततेचा संशय उपस्थित करत मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता राणे यांचा सिंधुदुर्गमधील चिवला येथील नीलरत्न बंगल्यावरही कारवाईचे आदेश देण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. संबधित बंगल्याच्या बांधकामादरम्यान CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याची तक्रार ऑगस्ट, 2021 मध्ये प्रदीप भालेकर या आरटीय कार्यकर्त्याने केली होती. त्यानंतर आता मुंबईनंतर या बंगल्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
'नोटीस मिळालेली नाही'
दरम्यान नारायण राणे यांचा हा बंगला चर्चेत आला असताना यावर कारवाई होणार का? हा प्रश्न समोर आहे. पण या कारवाईपूर्वी संबधित बंगल्याबाबत देण्यात आलेली कोणतीही नोटीस किंवा कागदपत्र मिळालं नसल्याचं नारायण राणे यांच पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
एकीकडे नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता सिंधुदुर्गमधील बंगल्याबाबतही कारवाईची चर्चा सुरु झाल्याने राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा आणखीच रंगला आहे. दरम्यान बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादांमुळे राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी वाढू शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? तसंच सिंधुदुर्गमधील बंगल्यावरही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?
- राणेंच्या अधीशवर कारवाई होणार? मुंबईत जुहूमधल्या बंगल्याची पालिकेच्या पथकाकडून पाहणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha