एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?

BMC Action on Narayan Rane Bungalow : राणेंच्या जुहूतल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई पालिकेचं पथक रवाना. अनियमिततेच्या आरोपांवरुन बजावलेल्या नोटीशीनंतर राजकारण शिगेला

BMC Action on Narayan Rane Bungalow : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) पथकाकडून गेल्या तासभरापासून पाहणी सुरू आहे. तर नारायण राणे आज स्वतः अधीश बंगल्यात उपस्थित आहेत. अधीश बंगल्यात अनियमिततेचा संशय उपस्थित करत मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज मुंबई महापालिकेचं पथक अधीश बंगल्यात (Narayan Rane Bungalow) धडकलं आहे. दरम्यान अधीश बंगला पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा नारायण राणेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी काय पाहणी करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी महापालिका अधिकारी राणेंच्या बंगल्यात काय पाहणी करणार आहेत, याची माहिती दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर... 
 
आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय पाहणी करणार? 

मुंबई महापालिकेकडे 2017 पासून राणे यांच्या अधिश बंगल्याबाबत तक्रार आहे. या तक्रारीत राणेंचा बंगला बांधताना सीआरझेडचे उल्लंघन झालं, तसेच बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भातच तपास करण्यासाठी मुंबई पालिका अधिकाऱ्यांचं पथक पहाणी करणार आहे. गेल्या आठवड्यात पालिकेनं नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तुमच्या बंगल्याबाबत काही तक्रारी आहेत. यासंदर्भात तपासणी करायची आहे. तसेच, बंगल्याची आवश्यक ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा, असं नारायण राणेंना कळवलं होतं.  

आता मुंबई महापालिकेचे अधिकारी आलेली तक्रार राणेंना दाखवून जो भाग अनधिकृत आहे, त्याची तपासणी करणार आहेत. अशातच नारायण राणेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंगल्यात कुठलंही अनधिकृत बांधकाम नाही, असा दावा केला होता. त्यामुळे पालिका अधिकारी नारायण राणेंकडील बंगल्याच्या कागदपत्रांचीही तपासणी करणार आहेत. तसेच अधिकारी बंगल्याची छायाचित्रही काढतील. रिटेनींग वॉल आणि बंगल्याचं बांधकाम यात 9 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. याचंही उल्लंघन केलं असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

पालिका अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करू : नितेश राणे 

मुंबईतील जुहूमधील आदिश बंगल्या संदर्भात स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे बंगल्यावर आहेत. ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतील आणि योग्य ते सहकार्य करू. तसेच मालवणमधील नीलरत्न बंगल्या संदर्भात आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ही नोटीस काढली की, महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयानं काढली हे पहावे लागणार आहे, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget