FDA : अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
FDA Action : साठवणुक केलेल्या काही अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे एफडीएचे म्हणणे आहे.
![FDA : अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ action by the Food and Drug Department Spices dry fruits worth Rs 29 crore seized storage of substandard material FDA : अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/ea73560a153715a4712d0dbc41c1d6161667695477459381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
FDA Action : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (Food And Drug Administration Department) नवी मुंबईत (Navi Mumbai) मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 29 कोटी रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एफडीएने टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, येथे 2 नोव्हेंबर रोजी धाड मारून कारवाई केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
एफडीएची मोठी कारवाई, 29 कोटी रुपयांचे अन्न पदार्थ जप्त.
या मोहिमेंतर्गत एमआयडीसी तुर्भे येथील मे. सावला फूड्स अँड कोल्डस्टोअरेज येथे भेसळयुक्त पदार्थांची एकूण किंमत 29.67 कोटी रुपये असून हा माल जप्त करण्यात आला आहे. येथील पेट्यांचे स्वरूप कोल्ड स्टोरेज असून यात बाहेरील देशातून आयात केलेल्या अन्न पदार्थांचा निकृष्ट दर्जाचा साठा आढळला. इथल्या कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या पेट्यांमध्ये आयातदारांनी विविध देशांमधून मसाले, ड्राय फ्रुट्स, सिरप्स इत्यादी अन्न पदार्थ साठविलेले आढळले. अन्न पदार्थाच्या गोण्या व बॉक्स हे लाकडी प्लॅटफॉर्मवर साठविलेले होते. यापैकी 35 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. तर 29 कोटींची साठा जप्त करून पुढील आदेश येईपर्यंत परवानाधारकाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. या वेळी अन्न नमुने घेताना बऱ्याचशा अन्न पदार्थांवर काहीही नमूद नव्हते. सुरक्षा व कायदा 2006 व नियमन 2022 मधील तरतुदीचे उलंघन होत असल्याचे आढळून आले.
निकृष्ट निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची साठवणूक
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून छापा टाकण्यात आलेल्या कोल्डस्टोअरेजमध्ये वेगवेगळ्या आयातदार पेट्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमधून मसाले, ड्रायफ्रूट्स, सीरप्स इत्यादी अन्नपदार्थ साठवलेले आढळले. या अन्नपदार्थांच्या गोण्या व खोकी हे लाकडी प्लॅटफॉर्मवर साठवलेले आढळले. कामगारांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या लगत अन्नपदार्थांची साठवणूक केल्याचे आढळून आले. तसेच कोल्डस्टोअरेजमध्ये झुरळ, उंदीर यांचा प्रादुर्भाव आढळून आला. या सर्व प्रकारामुळे अन्न पदार्थाची Nutritional Quality व Shelf Life यावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साठवणुक केलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने व कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे एफडीएचे म्हणणे आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे आदेशानुसार झाली असल्याचे समजते.
इतर महत्वाच्या बातम्या
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)