(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapu Airport : कोल्हापूर विमानतळ जमीन संपादनास गती; 300 जणांकडून संमतीपत्रे
Kolhapu Airport : कोल्हापूर विमानतळाच्या अतिरिक्त 64 एकर जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती आली आहे. जमिनीसाठी अंतिम दर जाहीर करून देय असणाऱ्या रकमेच्या 1048 जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या.
Kolhapu Airport : कोल्हापूर विमानतळाच्या अतिरिक्त 64 एकर जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती आली आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी अंतिम दर जाहीर करून देय असणाऱ्या रकमेच्या 1048 जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता जमीन संपादनासाठी संबंधित जागा मालकांकडून संमती पत्रे देण्यात येत आहेत. आतापर्यंत 300 हून अधिक जाणारी सम्यता पत्रे दिली आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी 64 एकर जागेचे अतिरिक्त भूसंपादन मुडशिंगी आणि तामगाव येथील आवश्यक जागेचे संपादन वाटाघाटीने आणि थेट खरेदी करून केले जाणार आहे.
संबंधितांना अधिकाधिक मोबदला मिळेल, या दृष्टीने दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी, बिगरशेती, रहिवास, गुंठेवारी आधी विविध स्वरूपांसह संबंधी जमिनीवरील सद्यस्थिती त्यावरील घर अन्य मिळकत उद्योग पीक आधी सर्वांचे मूल्यांकन करून प्रत्येक बाधिताला नेमकी रक्कम किती मिळणार ती नेमकी रक्कम दर्शवून संबंधितांना अंतिम नोटिसा काढण्यात आल्या यानुसार 1048 जणांना एकूण 209 कोटी 12 लाख 93 हजार 993 रुपये म्हणून भरपाई दिली जाणार आहे.
तामगावातील संपादित होणाऱ्या आवश्यक जागेचे यापूर्वी खरेदीखत झाले आहे. उर्वरित मुडशिंग हद्दीतील जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. संपादित होणाऱ्या जागेला योग्य दर्जा अशी मागणी जागमालकांची होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित परिसरातील जागेचे गेले काही वर्षात झालेले व्यवहार, बाजारभाव, परिसरातील व्यवहार, जमिनीचे स्वरूप आधी सर्वांची माहिती घेत मूल्यांकन केले आहे.
कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही त्यासाठी हिरवा कंदिल देण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर प्रकाशित झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर अर्थातच विमानतळ 24x7 सुरु राहणार आहे. विमानतळाच्या वैभवात भर घालणारी टर्मिनल इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असून मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे.
जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडू पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
इतर महत्वाच्या बातम्या