एक्स्प्लोर

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग; खासदार धनंजय महाडिकांची अचानक भेट देत पाहणी

Kolhapur Airport : बहुप्रतिक्षीत आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे.

Kolhapur Airport : बहुप्रतिक्षीत आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही त्यासाठी हिरवा कंदिल देण्यात आला आहे.  कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर प्रकाशित झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर अर्थातच विमानतळ 24x7 सुरु राहणार आहे. विमानतळाच्या वैभवात भर घालणारी टर्मिनल इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असून मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे.

जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडू पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

खासदार धनंजय महाडिकांची अचानक भेट देत पाहणी

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिवाळी पाडव्याला  कोल्हापूर विमानतळावर अचानक भेट देत 3 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या नाईट लँडिग सुविधेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग अपग्रेड, रनवे लाइटिंग, अन्य विकास उपक्रम समजून घेतले. 

1370 मीटर धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध

दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर धावपट्टीचे 1930 मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झालं आहे. 1370 मीटर धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डीजीसीएच्या पथकाने पाहणी करून परवानगी दिली आहे. 

अलायन्स एअरने बंगळूरनंतर आता कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवाही थांबवली

दुसरीकडे कोल्हापूर ते हैदराबाद (Kolhapur and Hyderabad) दरम्यान अलायन्स एअरची (Alliance Air flight services) विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. रविवारी कोल्हापूर विमानतळावरून विमान कंपनीचे शेवटचे उड्डाण झाले. गेल्या दोन वर्षांपासून सेवा अविरत सुरु होती. अलायन्स एअरची विमानसेवा बंद झाल्यामुळे इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स या दोनच कंपन्यांची हैदराबाद, मुंबई व तिरुपती या मार्गावरील विमानसेवा सुरू आहे.

गेल्या सहा महिन्यांत विमान कंपनीने अनेक वेळा उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे अनेकवेळा विलंब झाला होता. नवरात्र काळात उड्डाणे रद्द केल्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रवासी कोल्हापूर विमानतळावर दोन दिवस अडकून पडले होते. कोल्हापूर विमानतळावरून हैदराबाद मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने अलायन्स एअरची विमानसेवा पूर्ण बंद झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget