वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी आज सोलापुरात (Solapur) वारीसंदर्भाने (Wari) एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी आज सोलापुरात (Solapur) वारीसंदर्भाने (Wari) एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, असे आझमी म्हणाले. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळं रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमींच्या या वक्तव्यामुळं मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
चार फुटाचा माणूस, लायकी नाही, अबू आझमींची नितेश राणेंवर टीका
दरम्यान, यावेळी अबू आझमी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. चार फुटाचा माणूस ज्याची कोणती लायकी नाही तो उघडपणे हे हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतोय, अशी टीका अबू आझमी यांनी केली.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आज पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर येथे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
























