एक्स्प्लोर

एबीपी माझा इम्पॅक्ट; अवघ्या काही मिनिटात एसटी प्रशासनाचा 'यूटर्न', कर्मचाऱ्यांचे 100 टक्के वेतन होणार

एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन 7 तारखेलाच होणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता यासंदर्भात आज एबीपी माझाने बातमी दाखवली होती. बातमी झळकवताच एसटी प्रशासन खडबडून जागं झालं. यासंदर्भात एसटी प्रशासनानं आजच एक परिपत्रक जारी केलं आहे. एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन 7 तारखेलाच होणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत एबीपी माझाने कायम एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत एबीपी माझाचे आभार मानले आहेत.

एसटी प्रशासनाने आज जारी केलेल्या पत्रकात नमूद केलंय की, एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन सात तारखेलाच होणार आहे. तेही कुठलेही कपात न करता. मात्र एसटीच्या अधिकारी, लिपिक यांचे वेतन मात्र 50 ते 75 टक्केच होणार आहे.

वेतन अदा करतांना एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांची 100 टक्के हजेरी म्हणजे 31 दिवस उपस्थिती ग्राह्य धरून वेतन करण्यात येणार आहे. तर पर्यवेक्षकीय कर्मचारी व लिपिक व तत्सम वर्गासाठीच्या कर्मचाऱ्यांसाठी 31 दिवसाच्या 75 टक्के म्हणजेच 24 दिवसांचे वेतन होणार आहे. तर वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे 50 टक्के म्हणजे हजेरीचे 16 दिवस वेतन करण्यात यावे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी, लिपिक तसेच पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचे वेतन दोन टप्प्यात होणार आहे.

एसटीच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहकांची संख्या ही जवळपास 80 हजार आहे. चालक, वाहकांची आर्थिक पडवळ होऊ नये, यासाठी या वर्गातील कर्मचाऱ्यांचे म्हणजेच वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांचे वेतन हे दोन टप्प्यात न होता एकाच टप्प्यात तेही कुठल्याही प्रकारची कपात न होता होणार असल्यानं एसटीचा मुख्य घटक असलेल्या चालक, वाहक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Central Health Ministery | 24 तासात 386 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा : आरोग्य मंत्रालय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
Embed widget