एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23/08/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23/08/2018
- कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका, सहा महिन्यांच्या विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नगरसेवकपद रद्द https://goo.gl/gytNsr
- बेळगावच्या घनदाट चिखले जंगलात दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचं ट्रेनिंग, कर्नाटक पोलिसांकडून आरोपी भरत कुरणेच्या रिसॉर्टची झडती https://goo.gl/2Mbkn8
- केरळ पूरग्रस्तांसाठी विठुराया धावला, मंदिर समितीची 25 लाखांची मदत, तर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांकडूनही 10 कोटी रुपये मुख्यमंत्री मदत निधीत https://goo.gl/4u16tu नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनची केरळला 72 कोटींची मदत https://goo.gl/a2sHCQ
- मुंबईतील बंद असलेल्या लोअर परेल ब्रिजच्या बांधकामाचा तिढा सुटला, महापालिका आणि रेल्वे आपापल्या हद्दीत पुलाचं बांधकाम करणार, मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/fvrBoh
- मुंबईतील क्रिस्टल टॉवर अग्नितांडवाप्रकरणी कोर्टात बिल्डरने जबाबदारी झटकली, बिल्डर सुपारीवाला याला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी https://goo.gl/oTc8C3
- महाराष्ट्रासह चार राज्यात एकूण एक कोटींचं इनाम, कुख्यात नक्षलवादी पहाडसिंगचं छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण https://goo.gl/XcgNFs
- अंबरनाथमधील बबन वडापाव सेंटरच्या वड्यात मेलेली पाल आढळली, मनसेकडून दुकान बंद, दुकानमालकावर गुन्हा दाखल https://goo.gl/HA7rh5
- कौटुंबीक हिंसाचार किंवा हुंडाबळी प्रकरणात पतीच्या नातेवाईकांचा सहभाग स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे न्यायालयांना आदेश https://goo.gl/pEbKXt
- ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचं निधन, वयाच्या 95 वर्षी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास https://goo.gl/kETaWs
- आशियाई खेळांमध्ये पंधरा वर्षीय नेमबाज शार्दूल विहानचं रुपेरी यश, डबलट्रॅप नेमबाजीत रौप्यपदकाची कमाई, टेनिसपटू अंकिता रैनाला कांस्यपदक, कबड्डीत भारतीय पुरुष संघाची उपांत्यफेरीत हार https://goo.gl/kdwko4
आणखी वाचा























