एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 फेब्रुवारी 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 फेब्रुवारी 2019 | शनिवार
- भारतमातेचे वीरपूत्र शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दणाणला https://goo.gl/RwHpGn
- पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेळ, ठिकाण आणि शिक्षा आम्ही ठरवणार, यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकला पुन्हा इशारा, तर मोदींकडून महाराष्ट्रातील विकास कामांचं लोकार्पण https://goo.gl/Nk7Xp6
- पुलवामा आणि अवंतीपुरा येथून एक डझनहून अधिक संशयित तरुण ताब्यात, जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांचा शोध सुरु, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई https://goo.gl/8abtij
- पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली 'वंदे भारत एक्स्प्रेस' पहिल्याच प्रवासात खोळंबली, म्हशीने धडक दिल्याने ट्रेनचा खोळंबा https://goo.gl/R9GNVE
- मुंबईतील नालासोपाऱ्यात रेलरोको आंदोलन हटवण्यात पोलिसांना यश, पुलवामा हल्ल्याचा निषेधार्थ पश्चिम रेल्वे रोखली, तब्बल चार तास लोकल सेवेचा खोळंबा https://goo.gl/H8Jv8R
- पाकिस्तानात कार्यक्रम स्वीकारलाच कसा? दौरा रद्द केल्या प्रकरणी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांना अभिनेत्री कंगना रनौतचा सवाल, तर देशद्रोही असल्याचंही वक्तव्य https://goo.gl/Ugk5vR
- पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक शहीदांच्या कुटुंबीयांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून 5 लाख रुपये जाहीर https://goo.gl/3jZFQz
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरचं वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंना भोवलं, द कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी , सिद्धूच्या जागी अर्चना पुरण सिंगची एन्ट्री https://goo.gl/7qKxAL
- शिवसेना-भाजप युतीवर जवळपास शिक्कामोर्तब, विश्वसनीय सूत्रांची माहिती, विधानसभेसाठी50-50 चा फॉर्म्युला भाजपला मान्य, पालघरची जागा भाजपने सेनेसाठी सोडल्याचंही वृत्त https://goo.gl/iNP9V2
- फैझ फझलच्या विदर्भानं लागोपाठ दुसऱ्या वर्षी इराणी करंडकावर नाव कोरलं, शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात, इनामाची सगळी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या निधीला समर्पित https://goo.gl/QEo1gZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
शेत-शिवार
भारत
महाराष्ट्र
Advertisement