एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/04/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
![एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/04/2018 abp majha whatsapp bulletin for 10 April 2018 latest marathi news updates एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/04/2018](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/27183835/Whatsapp_Bulletin-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/04/2018
- साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला खंबाटकी घाटात भीषण अपघात, 17 मजुरांचा मृत्यू, 15 जखमी https://goo.gl/dw6bSt
- शेतकरी कर्जवाटपाची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे नाही, माहिती अधिकारात सरकारचं उत्तर, सरकारच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह https://goo.gl/3Eb2dF
- दहावीच्या पाठ्यपुस्तकालाही राजकारणाची वाळवी, राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गोडवे, चहूबाजूंनी टीकेची झोड https://goo.gl/byJNYx
- सत्ता आल्यावर भाजपला अच्छे दिन, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ, 2016-17च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक 1034 कोटींचं उत्पन्न, काँग्रेसकडे फक्त 200 कोटी, दिल्लीस्थित संस्थेचा दावा http://abpmajha.abplive.in/
- राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी होण्याची शक्यता https://goo.gl/Bz4QWR
- पिंपरी-चिंचवडसाठी नवं पोलिस आयुक्तालय मंजूर, ग्रामीण क्षेत्रातील 5 तर शहरातील 9 पोलिस स्थानकांचा समावेश, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/BDXCDd
- शिवाजी कर्डिलेंची भाजपमधून हकालपट्टी होणार नाही, मात्र शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेऊ, नगरमधील हत्याकांडप्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना मंत्र्यांची बोळवण https://goo.gl/Q5yXc2
- राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपात आणून आपले आंबे सडवू नका, पुण्यात गिरीश बापट यांची खोचक टीका, शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचाही अप्रत्यक्ष सल्ला https://goo.gl/dxpWrD
- मुंबईकरांसाठी खुशखबर, म्हाडाकडून लवकरच एक हजार घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात, यंदा गरिबांसाठी घरांची संख्या जास्त https://goo.gl/viJqyt
- आधी जोडीने श्रमदान, मग साखरपुडा, वॉटर कप स्पर्धेत नांदेडमध्ये श्रमदान करणाऱ्या महाबळेश्वरच्या नायब तहसीलदारांवर कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/Juo8Fk
- डासांची तक्रार केल्याने 'इंडिगो एअरलाईन्स'ने विमानातून उतरवलं, प्रवाशाचा आरोप, तर बेलगाम वर्तनामुळे प्रवाशाला उतरवल्याचा कंपनीचा दावा https://goo.gl/FKJ4xA
- अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पायउतार होणार, चौथ्यांदा सीईओ होणाऱ्या शर्मा वर्षअखेरीस पद सोडणार https://goo.gl/tTx9Z5
- तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीला घर सोडावं लागणार, कास्टिंग काऊचविरोधात अर्धनग्न निषेध केल्यानंतर घरमालकाची नोटीस https://goo.gl/cdwyJ1
- महाराष्ट्राची सून हीना सिद्धूचा सुवर्णवेध, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्ण, हीनाचं स्पर्धेतील दुसरं पदक https://goo.gl/btpyZ4
- मी राजीनामा देणार नाही, डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण, अमेरिकन काँग्रेससमोर झुकरबर्ग बाजू मांडणार https://goo.gl/pmWHXW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)