एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/01/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/01/2018
- भीमा कोरेगाव दगडफेकीच्या निषेधार्थ पुकारलेला राज्यव्यापी बंद अखेर मागे, भारीप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकरांची घोषणा, बंद शांततेत पार पडल्याचा दावा https://goo.gl/DKapsp
- आंदोलन शांत ठेवण्याची जबाबदारी एकट्याची नाही, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, बंददरम्यान राज्यभरात झालेल्या हिंसाचारातून हात झटकले https://goo.gl/DKapsp
- बंददरम्यान मुंबई आणि परिसरात तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून मुंबई पोलीस गुन्हे दाखल करणार, दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी कारवाई, रेल्वे पोलीसही गुन्हा दाखल करणार https://goo.gl/iPGqFu
- याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल केले होते, तेच गुन्हे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी https://goo.gl/voDCcd
- महाराष्ट्र बंदनंतर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात, सोशल मीडियातून चुकीची माहिती पसरवणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची माहिती https://goo.gl/Yy6BJD
- दोन्ही समाजात सलोखा राहावा, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा प्रयत्न करणार, दंगलीत मृत्यूमुखी दोन मराठा तरुणांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याची मागणी https://goo.gl/iPGqFu
- महाराष्ट्र बंदनंतर मुंबईतील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवा सुरु, रेल्वेसेवाही सुरळीत https://goo.gl/Yy6BJD
- बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यावर शुकशुकाट, पुण्यातही तणाव, नाशिक, नागपूरमध्ये जाळपोळ आणि बसेसवर दगडफेक https://goo.gl/Yy6BJD महाराष्ट्र बंदचा बॉलिवूडलाही फटका, मुंबईत शुटिंग रखडलं, थिएटर बंद झाल्यानं मोठं नुकसान https://goo.gl/97eDqR
- राज्यातील आज होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंगच्या सर्व परीक्षा रद्द, औरंगाबादच्या बामू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले https://goo.gl/PaEh21
- शिर्डीत शाळकरी मुलगी कालपासून बेपत्ता, भीमा कोरेगावातील तणावामुळे शाळा लवकर सुटली, मात्र चिमुकली अद्याप घरी परतलीच नाही https://goo.gl/5BL4SY
- पंतप्रधान मोदी मौनी बाबा बनून राहू शकत नाहीत, भीमा कोरेगावप्रकरणी पंतप्रधान मोदींनी निवेदन करावं, काँग्रेसची लोकसभेत मागणी https://goo.gl/y9HRsU
- भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटना, मायावतींचा आरोप, दोषींवर कडक कारवाई करण्याचीही मागणी https://goo.gl/n3sqJN
- समाज कंटकांना शिक्षा व्हायलाच हवी, खासदार संभाजीराजेंची मागणी, मूठभर कंटकांमुळे सामाजिक घडी विस्कटू न देण्याचं आवाहन https://goo.gl/Zj8WSY
- राज्यसभा उमेदवारीच्या शर्यतीमधून आशुतोष आणि कुमार विश्वास आऊट, आम आदमी पार्टीकडून एन.डी.गुप्ता, संजय सिंह आणि सुशील गुप्तांना संधी, आपमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हं https://goo.gl/WdtZ8H
- चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली, उद्या शिक्षेची सुनावणी होणार https://goo.gl/5p7HKQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement