एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन- पाऊस अपडेट 20/09/2017
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन*- *पाऊस अपडेट* – *20/09/2017: 9.10AM*
- मुंबईत काल दुपारपासून सुरु असलेला पाऊस आज सकाळपर्यंत कायम, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवर परिणाम, शहरात 210 मिमी, तर उपनगरात 303 मिमी पावसाची नोंद https://goo.gl/tqDRgS
- पावसामुळे मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वे अर्धा तास लेट, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं लेट, तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर- 10 ते 15 मिनिटे उशिराने https://goo.gl/tqDRgS
- पावसामुळे मुंबईतील शाळा, कॉलेज आज बंद, शिक्षणमंत्र्यांचा निर्णय, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारच्या शाळा बंद राहणार https://goo.gl/tqDRgS
- दादर-परेलमध्ये पाणी साचलं, तर मालाडमध्ये अर्धी बस पाण्याखाली, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी, अंधेरी, दहीसर, खार सबवे, अंधेरी स्टेशन परिसरात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक बंद https://gl/hKdyVd सायन ब्रिज बंद, जेव्हीएलआरवर मजास डेपोजवळ पाणी भरलं, वांद्रे लिंकिंग रोडवरही पाणी
- इस्टर्न फ्री वे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत, हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत, मिलन सबवे सुरु पण पाणी साचल्याने पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन https://gl/hKdyVd
- विरार पश्चिम स्टेशन रोड पूर्णपणे पाण्याखाली, रस्त्यावर गुडघाभर पाणी, नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी https://goo.gl/tqDRgS
- मुंबईत पावसामुळे 74 विमान उड्डाणांवर परिणाम, 56 फ्लाईट्स रद्द, मुंबई- दिल्ली 5 विमान उड्डाणं रद्द https://gl/3fmKFg तर मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचं विमान लँडिंगवेळी चिखलात रुतलं https://goo.gl/3eFmTs
- मुंबईत पावसामुळे पश्चिम रेल्वे रखडली, चर्चगेटहून रात्री 56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला पोहोचली
- मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस नाशिकपर्यंत सोडणार, चाकरमान्यांच्या मागणीमुळे रेल्वेचा निर्णय, पावसामुळे एक्सप्रेस रद्द झाली होती https://goo.gl/tqDRgS
- कोकणात मुसळधार, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत धुवांधार, रायगडमध्ये जोरदार
- पुण्यातही संततधार #पाऊस, खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर नाशिकमध्येही पाऊस कायम, धरणांतून विसर्ग सुरु https://goo.gl/tqDRgS
- पश्चिम महाराष्ट्र, मराठावडा आणि विदर्भातही पावसाची संततधार, साताऱ्यातील कोयना धरण भरण्यास अवघं 1 टीएमसी पाणी कमी, कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले, उजनी भरलं, जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार https://goo.gl/tqDRgS
- गुजरातची मासेमारी बोट रत्नागिरी किनाऱ्यावर भरकटली, बोट वाळूत रुतल्याने स्थिरावली, खलाशांना सुरक्षित बाहेर काढलं https://goo.gl/tqDRgS
- मुंबईत डब्बेवाल्यांची सेवा आज बंद, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डबे पोहोचणार नाहीत https://goo.gl/tqDRgS
- मेक्सिकोमध्ये 1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement