एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जानेवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जानेवारी 2020 | शुक्रवार 1. राज्याच्या तिजोरीत खडखडाट, तरीही आमदारांच्या पगारावर 79 कोटी रूपयांची उधळण तर सुमारे 800 माजी आमदारांना पेन्शनची खैरात https://bit.ly/35ldFHN 2. चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडी घोळ, खाती कमी इच्छुक जास्त, ठाकरे सरकारकडून नव्या खात्यांची निर्मिती होण्याची शक्यता https://bit.ly/2tn5o8X 3.भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन नांदेडमध्ये भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली, आमदार प्रशांत बंब ब्लॅकमेलर असल्याचा खासदार प्रताप चिखलीकर यांचा आरोप https://bit.ly/2SN96TS 4.जळगाव जिल्हा परिषदेचा गड खडसे-महाजनांनी राखला, भाजपच्या रंजना पाटील अध्यक्षपदी, वैधानिक पेच निर्माण झाल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषद उद्यावर ढकलली https://bit.ly/2Fji2s1 5.आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे, फडणवीस आणि महाजन जळगावमध्ये एकत्र, तर नाराजीविषयी कोणतीही चर्चा नाही, खडसेंचा दावा https://bit.ly/36poqda 6.कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांच्या खासदार धैर्यशील मानेंसमोरच नदीत उड्या, मायक्रोफायनान्सचं कर्ज माफ करण्याची मागणी https://bit.ly/2MQGNjG 7.शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीनं करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश, तर शिवभोजन थाळी 26 जानेवारीपासून सुरु होणार https://bit.ly/37peNeO 8.संजय राऊत आणि कम्युनिस्ट नेते एकाच मंचावर, डाव्यांनी पुकारलेल्या देशव्यापी कामगार संपात शिवसेना सहभागी होणार, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/37tOAMb 9.कराडचे शहीद जवान संदीप सावंत यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सावंत यांना वीरमरण https://bit.ly/2MRhopP 10.पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते स्पर्धेचं आज उद्घाटन https://bit.ly/2QIHH2Q यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























