Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा... महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा... महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक; देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संध्याकाळी ६ वाजता कोअर कमिटीची बैठक
देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन
राज्यसभा सदस्याबाबत बैठकीत अंतिम निर्णय होणार
बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार
मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासाठी घातलेली अट आणि भाजप हायकंमाडचा निरोप याबाबत बैठकीत चर्चा होणार
चिपळूण-गुहागर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
चिपळूण-गुहागर महामार्गावरील गणेशखिंड-पाचाड परिसरात चारचाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार विजय शिरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिरकर हे दुचाकीवरून चिपळूणहून गुहागरकडे जात होते. त्याचवेळी गुहागरहून चिपळूणकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक विरुद्ध दिशेत येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार विजय शिरकर यांना सुमारे 50 ते 55 फूट फरफटत नेत रस्त्यालगतच्या मोरीत फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या विजय शिरकर यांना प्रथम उपचारानंतर पुढील उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त चारचाकी व दुचाकी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिसरातील नागरिकांनी वाहनचालकांनी वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















