एक्स्प्लोर

Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

Sunil Tatkare: तुमचे जे सहकारी आहे ते टिकवा, कारण तुम्हीच एकेकाळी हडपसरमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी कोणाला घेऊन वर्षा बंगल्यावर उंबरठे झिजवत होतात याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि राष्ट्रवादाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्यातील शीतयुद्ध आता उघड झालं आहे. रोहित पवार यांनी सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर टीका केली असून तटकरेंनीही या टीकेला प्रत्त्युतर दिलंय. मात्र, अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. आजची बैठक ही निवडणूक (Election) जिंकल्यानंतर अनिकेत यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी होती. विरोधकांच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे, त्यामुळे ते घोडेबाजार झाल्याची टीका करतात. निदान विजय झाल्यानंतर तरी आमचे अभिनंदन करायला तरी शिका, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी खासदार संजय राऊत आणि रोहित पवारांवर टीका केली. 

रोहित पवारांनी माझ्या घराण्यावर बोलू नये, पवार घराणे हे देशात, महाराष्ट्रात महत्वाची भूमिका बजावणारे घराणे आहे. मात्र, त्यांची पुढील पिढी कोणत्या पद्धतीने बोलते हा त्यांचा भाग असणार आहे. रायगडमधील जनतेने मला निर्वाचित केलं आहे, असे म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांवरील संताप व्यक्त केला. 

राष्ट्रवादी जर भाजपला सोडणार असेल तर आम्ही एकत्र येऊ असे रोहित पवारांनी म्हटलंय, याबाबत सुनील तटकरेंनी पत्रकरांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, रोहित पवारांना कोण विचारतंय, त्यांना सल्ला देण्याचा अधिकार काय? असे म्हणत सुनील तटकरेंनी परखड शब्दात प्रतिक्रिया दिली. अजित दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा यांनी सुरू केली, मग विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हाही मी सांगितलेलं आहे की, आम्ही महायुतीत आहोत, भाजप हा महायुतीतील प्रमुख पक्ष आहे, म्हणजे विलिनीकरणानंतर कोण महायुतीत येणार होतं. आम्ही तर भाजपला सोडणार नव्हतो ना, असा सवाल करत रोहित पवारांची भूमिका दुटप्पी असल्याचं तटकरेंनी म्हटलं.

तुमचे जे सहकारी आहे ते टिकवा, कारण तुम्हीच एकेकाळी हडपसरमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी कोणाला घेऊन वर्षा बंगल्यावर उंबरठे झिजवत होतात याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर कर्जत-जामखेडमधून राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून उभे राहण्यासाठी कोणाकोणाकडे कोणाच्या मार्फत गेला याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे, उगीच मलाच राजकारण कळतं असा आव आणू नका, असे म्हणत सुनील तटरेंनी आमदार रोहित पवारांनाच चांगलंच फटकारलं. 

नवनीत राणांना उमेदवारी नाही - तटकरे

नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. त्यासंदर्भात सुनील तटकरेंनी रोहित पवारांना फटकारलं. आमच्या पक्षात कोणी सल्ला देण्याची गरज नाही, नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा आमचा कोणताच विचार नाही. मात्र, छगन भुजबळ यांच्या संदर्भातील अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील, आज सायंकाळी याबाबत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, त्यात नाव अंतिम होईल, असेही तटकरेंनी स्पष्ट केले. 

हेही वाचा

आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget