एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 डिसेंबर 2019 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 डिसेंबर 2019 | सोमवार
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरेंसह महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ तर आता खातेवाटपाची प्रतीक्षा https://bit.ly/2ZBSjo1
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले, तेच मित्रपक्ष शपथविधीला बेदखल; राजू शेट्टींची खदखद https://bit.ly/2MEx1Rs
- एकाच घरात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद तर मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं, विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी, मंत्रीमंडळ विस्ताराची ठळक वैशिष्ट्ये https://bit.ly/39skg6a
- शपथविधीनंतर राज्यभरात जल्लोष, बारामती, परळी, लातूर, शिर्डी, नागपुरात आतिषबाजी, पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा https://bit.ly/2QwbvQ1
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही; 43 पैकी केवळ तीनच महिला मंत्री https://bit.ly/2rGI71d
- कळंब पंचायत समिती सभापतीच्या निवडीवरून भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेना खासदारांच्या गटामध्ये राडा, राणा जगजीतसिंह पाटलांनी शिवसेना कार्यकर्त्याच्या डोक्याला रोखली बंदूक, पाटलांसह 18 जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/2QJGsk3
- बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत उद्या निवृत्त होणार https://bit.ly/2FbxHJP
आणखी वाचा























