एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- अर्थचक्राला गती देण्यासाठीच अनलॉक मात्र 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, गाफील राहू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन, कोरोनाचा धोका टळला नसल्याचाही इशारा https://bit.ly/2VoT17t
- आषाढी वारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी, गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक https://bit.ly/31qhf4L
- 'शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होणार', बोगस बियाणांच्या तक्रारींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल https://bit.ly/3g6sQdq
- तीन महिन्यांनंतर राज्यातील सलून, ब्युटी पार्लर सुरू, कोल्हापुरात पहिल्या ग्राहकाच्या केसांवर सोन्याची कात्री चालली, कंटेन्मेंट झोन वगळता सर्व भागात सलून, पार्लर सुरू https://bit.ly/3i966vh
- ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती, लष्कर बोलावणार असल्याच्याही अफवा https://bit.ly/2BhBHua
- पनवेलमध्ये नियम तोडून केलेलं लग्न महागात, नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, 12 जण पॉझिटिव्ह https://bit.ly/2B9DCRD तर पुणे जिल्ह्यात लग्नात डीजेवर धरला ठेका धरल्याने वधुवराच्या आईवडिलांसह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा https://bit.ly/2CGWd7I
- कोविड संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, राज्यात आतापर्यंत 1 लाख 36 हजार गुन्हे दाखल तर 27 हजार 721 व्यक्तींना अटक https://bit.ly/2ZlkLL8
- संसदेत चर्चेला या, दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, गृहमंत्री अमित शाह यांचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुलं आव्हान, सरेंडर मोदी टीकेवरही अमित शाह यांचा पलटवार https://bit.ly/2BPdgUB
- भारत मैत्री करणे जाणतो तसंच उत्तर देणेही जाणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनला गर्भित इशारा, मन की बातमधून मोदींचा जनतेशी संवाद https://bit.ly/31rFTCa
- पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ मात्र परिक्रमेत अडचण नसल्याचा प्रशासनाचा खुलासा https://bit.ly/2CLIVXD तर आषाढी एकादशीला मोजक्या वारकऱ्यांना पंढरपुरात येऊ देण्याच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन https://bit.ly/3eJIMlQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement