ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2021 | शनिवार
1. नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोक्यो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं गोल्ड मिळवलं https://bit.ly/3iuJKXq टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनीयाने कांस्य पदक जिंकलं.. कझाकस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात https://bit.ly/3CqnxBH
2. गोल्फमधील भारताच्या आशा मावळल्या, अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं, चौथ्या स्थानावर राहिली अदिती https://bit.ly/37uwr2R पंतप्रधान मोदींकडून गोल्फर अदिती अशोकच्या पाठीवर कौतुकाची थाप; राष्ट्रपती, क्रीडा मंत्री यांनीही केली प्रशंसा https://bit.ly/3yuMhq8
3. जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची ट्वीटरवरुन माहिती https://bit.ly/2VyUlHG
4. बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमागचं सत्य! गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल, दोघे ताब्यात https://bit.ly/2VpEKL3
5. तेजस ठाकरे राजकारणात येणार? वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकरांची जाहिरात अन् चर्चेला ऊत https://bit.ly/3lC1p1f
6. महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार? देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची गुप्त भेट https://bit.ly/2U1zAUL राज ठाकरेंच्या भेटीबाबत श्रेष्ठींना माहिती देणार, दिल्ली भेटीवर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/2WVOvRi
7. चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; नगरपालिका पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागांना पाठवणार कायदेशीर नोटीस! https://bit.ly/3irg2m6
8. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजारांच्या आत, मृतांच्या संख्येत मात्र वाढ https://bit.ly/3s3xikC राज्यात शुक्रवारी 5539 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 5859 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/37sVO4U
9. पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल https://bit.ly/37sWhnG
10. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा! संघाची जबाबदारी जानेका शॉपमन यांच्याकडे https://bit.ly/2WU84td
ABP माझा कट्टा :
अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी संवाद.. पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा ब्लॉग :
BLOG | अजून एक हुलकावणी देणारा दिवस... अनिरुद्ध ढगे यांचा ब्लॉग https://bit.ly/3iwKmMd
ABP माझा स्पेशल :
1. Rabindranath Tagore : रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या दहा महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/3AkmYaB
2. शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्या, खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/37s5Rra
3. MSD Twitter Verification : ट्विटरकडून एमएस धोनीचं अकाउंट पुन्हा व्हेरिफाइड, ब्लू टिक परत केली https://bit.ly/3jDtOl4
4. BAN vs AUS: बांगलादेशनं रचला इतिहास, सलग तीन टी 20 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिका जिंकली https://bit.ly/3fFYl08
5. Corona Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड ब्रेक, 50 कोटींचा टप्पा ओलांडला https://bit.ly/3xzzz86
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

