एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2020 | रविवार
- लॉकडाऊनमध्ये किती मुभा द्यायची याचा विचार 3 मे नंतर करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती, ट्रेन सुरू होणार नसल्याचाही पुनरुच्चार https://bit.ly/2yFG7JD
- राज्यांना मदत मिळाली नाही तर केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र https://bit.ly/35hJov7
- बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, आयएएस अमिताभ गुप्ता प्रकरणाची चौकशी पूर्ण, वाधवान यांना पत्र दिल्याचं अमिताभ गुप्तांकडून कबूल, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती https://bit.ly/355BLaQ
- कोरोनाच्या संकटादरम्यान डॉक्टर्स, पोलीस आणि व्यवस्थेबद्दल लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात'मधून संवाद https://bit.ly/35504Wx
- मुंबईत दोन दिवसांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, धारावी भागात ड्युटीवर असताना कोरोना विषाणूंचा संसर्ग https://bit.ly/3aKLnJu
- घरात बसणे हीच देशसेवा, माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला https://bit.ly/3cPm7Db
- जगभरात कोरोनामुळं बळींची संख्या दोन लाखांवर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 लाख 20 हजारांवर https://bit.ly/2yLUjAG
- राजस्थानच्या कोटातील विद्यार्थी परतण्यास सुरुवात, काही विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहनांची सोय, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेसची चाचपणी https://bit.ly/2zxStUH
- ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं निधन, गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाघातामुळे होते आजारी https://bit.ly/3eV7dwT
- अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर प्रतितोळा 48 हजार पार, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात 11 हजारांनी वाढ https://bit.ly/3cPqMFi
आणखी वाचा























