एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2020 | मंगळवार 1. महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या गंभीर स्थितीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेटची बैठक; शिवभोजन योजना, वैद्यकीय शिक्षण या विषयी बैठकीत महत्त्वाचे निर्णय 2. कोरोनामुळं पुण्यात एकाच दिवसात तिघांचा मृत्यू, तर राज्यात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 24 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 891 वर 3. लॉकडाऊन वाढवण्याबाबत केंद्र स्तरावर विचारमंथन सुरु; राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊन वाढवण्याची गरज 4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेतील पोलिसांसह कर्मचारी होम क्वारंटाईन तर नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या निवासस्थान परिसरात कोरोनाचा रुग्ण 6. भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल, संचारबंदीचे नियम डावलून चैत्री एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाची पूजा 7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित, 26 एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा तात्पुरती स्थगित 8. मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची मागणी तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा 9. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं अर्ध पुणे सील, बहुतांश भागात शुकशुकाट, शहरातील रस्ते ओस 10. कोरोनाचं जगातील संकट पाहता भारताचा मदतीचा हात; अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार, पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांची माहिती BLOG | सुश्रुशेची दायी आमची नर्स ताई, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























