![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2021 | सोमवार ABP Majha Top 10 headlines Corona unlock updates yoga Day latest news ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2021 | सोमवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/21/24131c15995aacbd888c04322aa8eb90_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एबीपी माझाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2021 | सोमवार
1. नवी दिल्लीत उद्या शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची सर्वात मोठी बैठक, 15 पक्षांचे नेते एकत्र येणार https://bit.ly/3cZCAHj
2. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा https://bit.ly/3xCk27T
3. देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, मुंबईसह महाराष्ट्रात मात्र 30 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण https://bit.ly/3wOp3u7
4. मुंबई अनलॉकच्या पहिल्या स्तरात, मात्र भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेमुळे लेव्हल 3 चेच निर्बंध लागू, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करणं लांबणीवर https://bit.ly/3iVYtLo
5. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामकरणात तिसरा पर्याय.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायाचंच नाव असेल, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका https://bit.ly/3qcsEzP
6. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत असल्याने त्यांच्यात वितुष्ट येऊ नये छगन भुजबळ यांचे मत https://bit.ly/3wOaIOc तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी https://bit.ly/35BYaxE
7. देशात 88 दिवसांनी सर्वात कमी नव्या 53,256 कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत 1422 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3xHPFNz रविवारी राज्यात 9,101 रुग्ण बरे होऊन घरी, 9,361 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या जवळ https://bit.ly/2TSxxSw
8. औरंगाबादेत निजामाचा वंशज असल्याचं सांगत 400 एकर जमिनीवर दावा, एक एकर जागा 25 लाखात विकली! निजामाचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्याला अटक https://bit.ly/2TUYftO
9. नांदेडमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेत 30 हजार बोगस लाभार्थी, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3gFhosp
10. नागपुरात मन सुन्न करणारी घटना, कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या https://bit.ly/3wKHfF0
ABP माझा स्पेशल :
1. कोरोना संकटात योग आशेचा किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आवाहन, यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस https://bit.ly/3vLakyA
2. World Music Day 2021 : जागतिक संगीत दिनाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास आणि आपल्या जीवनातील महत्त्व https://bit.ly/3gHaHpS
3. जळगावच्या केळींना जीआय मानांकन प्राप्त; वर्षभरात बाराशे कंटेनर आखाती देशात निर्यात, उत्पादकांसाठी सुवर्णसंधी https://bit.ly/3wMawiv
4. Nirjala Ekadashi : भगवंताची प्राप्ती करून देणारी जेष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशी, काय आहे महिमा https://bit.ly/3zC1J4J
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)