ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2024 | शनिवार
1. मागासवर्ग आयोगाच्या हरकती, सूचनांचा एक्स्क्लुझिव्ह अहवाल माझाकडे, 40 टक्के लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय तर 41 टक्के लोकांनी मागास नसल्याचं म्हटलं http://tinyurl.com/muxdaac8
2. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार, 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार http://tinyurl.com/4ykx2ymh
3. कोल्हापुरातील महाधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, आपल्याला मारण्याचा कट आखल्याचा शिंदेंचा ठाकरेंवर आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेची टीका http://tinyurl.com/ywcnr7h8 मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय, श्रीकांतने माझे डोळे उघडले; एकनाथ शिंदेंची खंत http://tinyurl.com/mrvenk2c
4. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला, याविरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका http://tinyurl.com/bde2n89m
5. मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच, मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा देण्यासाठी अस्लम शेख आणि अमीन पटेलांची मागणी http://tinyurl.com/bp9wyucb
6. दक्षिण मुंबईसाठी भाजपचा प्लॅन तयार, मराठी भागात ठाकरेंना नमवायला मनसेची साथ घेण्याची शक्यता http://tinyurl.com/y8erdsdb दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजपला उमेदवार मिळेना, ठाकरे गटाच्या सचिन अहिरांची टीका, लोक अरविंद सावंतांच्या पाठिशी असल्याचा दावा http://tinyurl.com/duny8xuv
7. चिपळूण राड्याप्रकरणी तिघांना अटक, ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा समावेश http://tinyurl.com/2p8mcknb चिपळूणमध्ये गोंधळ घालायचा हे राणे गटाचं आधीच ठरलं होतं, भास्कर जाधवांचा आरोप http://tinyurl.com/4h5r73dm
8. लोकांची सहानभुती मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, आम्हाला भावनिक आवाहन करण्याची गरज नाही, सत्य काय हे लोकांना माहिती, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल http://tinyurl.com/ytcaxzkr अजितदादा असं भावनिक आवाहन करतील ही अपेक्षा नव्हती, आमदार रोहित पवारांची अजित पवारांवर टीका http://tinyurl.com/2yrw48fd
9. दंगलमधील 'छोटी बबीता' सुहानी भटनागरचे निधन, अवघ्या 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप http://tinyurl.com/v3ue55dw
10. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालच्या शतकी तडाख्याने टीम इंडियाची कसोटीत वापसी; 322 धावांची महत्त्वपू्र्ण आघाडी http://tinyurl.com/bdh42txx वेगाने तीन शतके झळकावत जैस्वालने संजय मांजरेकर आणि विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला http://tinyurl.com/3mrwncfx
एबीपी माझा स्पेशल
विधानसभा अध्यक्षपद सोडणे ही घोडचूक, नाना पटोले जबाबदारी संभाळत नाहीत, अशोक चव्हाणांनी 'माझा कट्ट्या'वर काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला http://tinyurl.com/yca4m4bv
डोळ्यात डोळे घालून मतदारसंघात 'जय श्रीराम' म्हणणार का? अशोक चव्हाणांकडून सुटसुटीत उत्तर! http://tinyurl.com/zc998xx9
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w