ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2024 | बुधवार
1. भारतात जेव्हा जातीपातीवरून पक्षपात होणार नाही, तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, राहुल गांधींचे अमेरिकेत वक्तव्य, तर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला, अमित शाहांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ba9dtjh5 आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा खरा चेहरा पुढे आला, भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका https://tinyurl.com/mpf4j4xd
2. नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन समोर, कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी https://tinyurl.com/2vs9fuj6 नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे RTO अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन, अपघातावेळी कारचा वेग 60 किमी असल्याचं स्पष्ट https://tinyurl.com/3nkf7ufj
3. शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं https://tinyurl.com/3r9b4c75
4. आमदार फडणवीसांच्या दडपणाखाली बोलतात, त्यांची लेकरं विदेशात जातील, आरक्षणाची किंमत स्वत:च्या लेकराला विचारा, मराठा आरक्षणासाठी मनोज जरागेंचे आवाहन https://tinyurl.com/yu9uxhem मराठा आरक्षणासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत आंदोलन करणार, विशेष अधिवेशन बोलावण्याची सरकारकडे केली मागणी https://tinyurl.com/26cs44rw
5. भाजपकडून किरीट सोमय्यांना निवडणूक कॅम्पेन कमिटीच्या सदस्यपदाची जबाबदारी, पण सोमय्यांनी जबाबदारी नाकारली https://tinyurl.com/3uavaus7 2019 साली देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला अमित शाहांच्या पत्रकार परिषदेतून जायला सांगितलं, तेव्हापासून कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, किरीट सोमय्यांची खंत https://tinyurl.com/ynmddzzk
6. शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/yv3k34vw
7. भीषण अपघातानं कोल्हापूर हादरलं; सरवडे येथील भीषण अपघातात बोलेरो-ट्रकचा चक्काचूर, सोळांकुर गावातील तीन तरुणांचा मृत्यू https://tinyurl.com/2yt6j2mx
8. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, आईच्या घरासमोरच लावली मृतदेह ठेवलेली रिक्षा, पिंपरीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4ujttbbn
9. हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदींनी पायउतार व्हावं, योगी आदित्यनाथ यांच्याकडे सत्ता सोपवावी, अभिनेतेशरद पोंक्षेंची सांगलीतील गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मागणी https://tinyurl.com/3fbpkrws
10. अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, वांद्रयातील इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं https://tinyurl.com/y7nta45c मलायका 11 वर्षांची असताना आईवडिलांचा घटस्फोट, कोण होते अनिल अरोरा? https://tinyurl.com/yemhrych
एबीपी माझा स्पेशल
दादा, तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय? तुमच्यासाठी पवारसाहेबांना धोका दिला, आम्ही काय मिळवलं? अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल https://tinyurl.com/5x494xp3
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w