(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2024 | सोमवार
1.देशभरात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांना भारताचं नागरीत्व मिळणार https://tinyurl.com/yrhvfjbr
2.सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका, निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही डेडलाईन https://tinyurl.com/5b449t46 येत्या 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने SBI ला झापल्याचा परिणाम https://tinyurl.com/58hv7dt7
3 सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांविरोधात बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार; शिवसेना नेते विजय शिवतारेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/y484bh8u अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय, विजय शिवतारेंनी दंड थोपटले https://tinyurl.com/3es5yt5u
4 अजित पवार गटाला पहिला धक्का बसण्याची शक्यता, आमदार निलेश लंके साथ सोडण्याच्या तयारीत, शरद पवार गटात प्रवेशाची चिन्हं https://tinyurl.com/yknxpr9x शरद पवारांचे कानावर हात, पण निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाची सूत्रं सकाळीच फिरली? अमोल कोल्हेंसोबत गुप्त बैठक https://tinyurl.com/exes9uxc
5 महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच्या हाती मशाल, 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगली लोकसभेतून उमेदवारी जवळपास निश्चित https://tinyurl.com/ydzesvf6 साहेब तुम्हाला वचन देतो, महाराष्ट्रात सगळ्यात पहिला निकाल सांगलीतून येईल; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/3pk3vzkk
6 हातकणंगलेत विनय कोरे, कोल्हापुरात महाडिक किंवा घाटगे, भाजपचा आग्रह, सर्व्हेही दाखवला, मात्र एकनाथ शिंदेंचा नकार असल्याची चर्चा, आता अमित शाहांच्या बैठकीत फैसला होणार https://tinyurl.com/4uu298w2 भाजपला गडकरींची अडचण, नागपुरातील अधिकाऱ्यांच्या मदतीने अडकवण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/mw2x3vtf
7 पाच वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची; पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत https://tinyurl.com/4zcwkkc8 'महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही', महादेव जानकर आक्रमक, मविआसोबतही चर्चा https://tinyurl.com/ym4pvck2
8 पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय; बाळू धानोरकरांच्या पत्नीचे खळबळजनक आरोप https://tinyurl.com/4fnc6rsr
9 शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मुंबईत थीम पार्क उभारणार; महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेटमध्ये 19 धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/y6a27ujc
10.आयपीएलच्या पुढील हंगामात रोहित शर्मानं चेन्नईसाठी खेळावं, एमएस धोनीनं निवृत्ती घेतली तर रोहित शर्मा चेन्नईचं कर्णधारपदही संभाळू शकतो, अंबाती रायडूची प्रतिक्रिया https://tinyurl.com/msc3n4tc
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w