एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन |30 नोव्हेंबर 2019 | शनिवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. विधानसभेत ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणी, हंगामी अध्यक्ष म्हणून वळसे-पाटलांची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नेमणूकही आजच होणार
2. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच तर विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडे, अजित पवारांच्या दाव्याला जयंत पाटलांचीही पुष्टी, काँग्रेस नेत्यांकडून मात्र प्रतिक्रिया नाही
3. मेट्रो आरे कारशेडच्या कामाला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, तर प्रकल्पांबाबत सरकार गंभीर नाही, फडणवीसांची टीका
4. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांना वंदन करुन कामाला सुरुवात, मंत्रालयात अभूतपूर्व स्वागत
5. मोदी-शाह जोडीने एक फोन केला असता तर युती टिकली असती, एबीपी माझाच्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊतांची खंत
6. महामार्गावरुन प्रवास करताना 'फास्टटॅग' अनिवार्य, 15 दिवसांची मुदवाढ, एक डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून फास्टटॅग बंधनकारक
7. देशाच्या जीडीपीत अभूतपूर्व घसरण, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 5 वरुन साडे चार टक्क्यांवर, अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
8. उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता, माहीम किंवा उस्मानाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा
9. महात्मा गांधींच्या योगदानाचा सन्मानच, नथुराम गोडसेबाबतच्या विधानावर साध्वी प्रज्ञासिंहचा माफीनामा, तर नाव न घेता राहुल गांधींवर टीका
10. पुण्यातील एनडीएचा 137 वा दीक्षांत समारोह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची हजेरी, 211 नव्या दमाच्या जवानांचं पथसंचलन
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2019 | शनिवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement