एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 30 ऑगस्ट 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- अनलॉक 4.0 साठी केंद्र सरकारची नवी नियमावली, सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास केंद्राची परवानगी, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
- देशात कुठेही ई पास शिवाय प्रवासासाठी केंद्राचा हिरवा कंदील; आता राज्याच्या निर्णयाकडे लक्ष
- विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कुलगुरु समितींची आज बैठक; उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णयाची शक्यता, मंत्री उदय सामंत यांची माहिती
- राज्यात काल दिवसभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 16 हजार 867 कोरोना बाधितांची नोंद, गेल्या 24 तासात 328 कोरोनाबळी
- मंगेशकर कुटुंबियांचं वास्तव्य असलेली प्रभूकुंज इमारत सील, कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा निर्णय
- भविष्यातल्या गुंतवणुकीबाबत सुशांतची ऑडिओ क्लिप 'माझा'च्या हाती, बँक खात्यातून पाच वर्षात 70 कोटींचा व्यवहार; रियाची आजही चौकशी होण्याची शक्यता
- मुंबई, ठाणे, पालघर, रायगडवर पाच ते सहा किलोमीटरचे ढग; हवामान विभागाची माहिती; अतिमुसळधार पावसाचा इशारा
- भिवंडीत आईच्या डोळ्यासमोर दोन लेकरांचा मृत्यू, सेल्फी काढत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघं कामवारी नदीत बुडाले
- भंडारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- एसटीचा राज्यात पहिलाच उपक्रम! धुळे एसटी महामंडळाच्या 25 मालवाहू ट्रक गल्लोगल्ली फिरुन गणेश मूर्ती संकलित करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
भविष्य
क्रिकेट
बॉलीवूड
Advertisement