एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 मे 2021 | शनिवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
- राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता; तर 1 जूनपासून कार्यालयं 50 टक्के क्षमतेने सुरू होणार, सूत्रांची माहिती
- 'राज्याच्या हिश्श्याची गतवर्षीची GSTची 24 हजार कोटींची भरपाई तत्काळ द्या', अजित पवारांची केंद्राकडे मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात 6 जूनपर्यंत भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार, खासदार संभाजीराजेंचा सरकारला इशारा
- दहावीच्या निकालासाठी सरकारचा फॉर्म्युला, मुल्यमापनासाठी नववी आणि दहावीचे अंतर्गत परीक्षेचे गुण ग्राह्य धरणार; तर 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी
- मर्यादीत संख्येत पायी दिंडीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी; गुरुवारपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
- राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, काल दिवसभरात 20 हजार 740 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर रिकव्हरी रेटही 93.24 टक्क्यांवर
- मुंबई महापालिकेकडून लसीकरणासाठी सुधारित नियमावली जाहीर; परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा
- मुंबईच्या टोल नाक्यावरील पिवळी पट्टी गायब, टोलच्या नियमांची पायमल्ली; कोल्हापुरात मात्र वेगळं चित्र
- केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांमधल्या वादाला अखेर ब्रेक, सरकारच्या सुचनेप्रमाणे अनेक कंपन्यांकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement