स्मार्ट बुलेटिन | 29 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यातील सर्व मंदिरं खुली करा, भाजपची मागणी, गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्त्यांचं घंटानाद आंदोलन
2. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सामनातून नाराजी, विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या म्हणत केंद्र सरकारवर निशाणा
3. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता, काल सीबीआयकडून रियाची तब्बल दहा तास चौकशी
4. सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीवर सीबीआयचा संशय, जबाबात वारंवार बदल करत असल्याची सीबीआयच्या सूत्रांची माहिती
5. आरेतील मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, कारशेडवर झालेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, प्रवीण दरेकरांचा सवाल
6. मुंबईसह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
7. मुंबईकरांची पाणीकपात आजपासून मागे, सातही धरण क्षेत्रातील एकूण जलसाठा 95 टक्क्यांच्या वर, तर ठाणे, भिवंडीला नियमित पाणीपुरवठा होणार
8. अशक्तपणामुळे नांडेदचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज रुग्णालयात दाखल, महाराजांच्या समाधीच्या अफवेने भक्तांची अलोट गर्दी
9. कोरोनामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा राष्ट्रपती भवनाऐवजी ऑनलाईन, पाच जण खेलरत्न तर 27 जण अर्जुन पुरस्काराचे मानकरी
10. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, चेन्नई सुपर किंग्जच्या एका खेळाडूसह सपोर्ट स्टाफच्या काही सदस्यांना कोरोनाची लागण