स्मार्ट बुलेटिन | 28 एप्रिल 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यात 3 तारखेपर्यंत कोणताही दिलासा नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊन वाढवण्याचा सूर
2. काल दिवसभरात राज्यात 522 कोरोनाचे नवे रूग्ण, तर एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 हजार 590 वर, दिवसभरात 27 जणांचा मृत्यू
3. देशात 24 तासांत 1396 नवे कोरोना बाधित, एकूण आकडा 28 हजार पार, आतापर्यंत 6 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त तर 886 रूग्णांचा मृत्यू
4. जगभरात 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण, 2 लाख 11 हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू, तर 9 लाख 22 हजार 387 रूग्ण कोरोनामुक्त
5. पुण्यात 7 दिवसांत कोरोनाचे दुप्पट रूग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची माहिती; सरासरी 9 चाचण्यांनंतर एक कोरोना पॉझिटिव्ह
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 एप्रिल 2020 | मंगळवार | ABP Majha
6. राजस्थानमधील कोटात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी येत्या 2 दिवसांत 100 एसटी बसेस पाठवणार; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
7. खतं आणि बियाणं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्याचं नियोजन, 31 मेपूर्वी पुरवठा करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश, मंत्रिमंडळ बैठकीतही शेतीविषयक मोठे निर्णय
8. विद्यापीठाच्या परीक्षांबाबत 8 दिवसांत गाईडलाईन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती; परीक्षा झाल्या पाहिजेत असं युजीसीचं मत
9. नवी मुंबई एपीएमसी येथील भाजी व्यापाऱ्याला कोरोना, फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्यालाही लागण, 100 गाळे पूर्णतः सील
10. कोलकाता ते मुंबई तीन दिवस 2000 किमीपेक्षा जास्त प्रवास, दिपांकर दत्ता यांचा आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथविधी