स्मार्ट बुलेटिन | 25 ऑगस्ट 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. रायगडच्या महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, आठ जणांना बाहेर काढलं, अजूनही 19 ते 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
2. रायगडमधील इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करा, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
3. 1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार, अनलॉक 4 साठी गाईडलाईन्स जारी होण्याची शक्यता
4. खात्री होईपर्यंत एखाद्या गोष्टीबाबत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही, मुंबई लोकल आणि ई-पासबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं सूचक वक्तव्य
5. ठाण्यातील रुग्णालयांकडून अवाजवी बिलांची आकारणी, आयुक्तांकडून दखल; जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश
6. काँग्रेस अध्यक्षपदाबाबत पत्र लिहिणाऱ्या 23 जणांना अहमद पटेल यांचे खडेबोल, तर कार्यकारिणीच्या बैठकीतील घमसानानंतर सोनिया गांधींकडेच हंगामी अध्यक्षपद
7. जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी देशभरात मोहीम, विद्यापीठ परीक्षांबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
8. सोलापुरात भाजप नगरसेवकाच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड, पळून जाण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू, नगरसेवक सुनील कामाठी यांच्यासह 40 जणांवर गुन्हा
9. सुशांत सिंह राजपूतला भूतप्रेतांची भीती वाटायची, मित्र सिद्धार्थ पिठानीचा जबाब माझाच्या हाती, सुशांतची बहिण आणि रियामध्ये वाद झाल्याचाही दावा
10. मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल 26 वर्षानंतर परत मिळाली, वसईच्या महिलेला सुखद धक्का