एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 मार्च 2019 | गुरुवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 21 मार्च 2019 | गुरुवार | एबीपी माझा
- होळीच्या निमित्तानं राज्यभर समाजविघातक प्रतिकांचं दहन, मुंबईत मसूद अजहर, पबजी, चिनी वस्तूंचं दहन
- धुलीवंदनानिमित्त कलाकारासंह राजकीय मंडळी रंगात, दिवसभर एबीपी माझावर खास कार्यक्रमांची धुळवड
- पार्थ आणि रोहित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये होळी पूजन, आजोबा आणि बाबांनंतर पार्थसाठी भाऊ देखील निवडणुकीच्या मैदानात
- परभणीत भाजप-शिवसेनेतील वाद शिगेला, शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर भाजपच्या मेघना बोर्डीकर निवडणूक लढवण्यावर ठाम, अर्जुन खोतकरांची शिष्टाई निष्फळ
- भाजपत गेलेल्या सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी, अहमदनगरच्या लढतीची चुरस वाढली
- 70 जणांचा जीव घेणाऱ्या 2007 मधल्या समझौता बॉम्बस्फोटप्रकरणी असीमानन्दची सुटका, एनआयए न्यायालयाचा निर्णय
- नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची तारांबळ
- शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती कोचिंग क्लासकडे, डाटा लीकविरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पालक आक्रमक
- बेळगावात माजी आमदार पुत्राची हत्या, अज्ञाताने कार अडवून गोळ्या झाडल्या
- मुंबई-आग्रा महामार्गावर पेशंटला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागल्याने ऑक्सिजन सिलेंडरचे स्फोट, पेशंट सुखरुप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement