स्मार्ट बुलेटिन | 01 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. दूध दरवाढीच्या आंदोलनाला रात्रीपासूनच सुरुवात, सांगलीत रयत क्रांती संघटनेने दूध टँकर फोडला, पंढरपूर-सातारा रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन
2. बकरी ईद निमित्त मुंबईत मिनारा मशिदजवळ यंदा गर्दी नाही, पोलिसांचं कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत जामा मदिशीत सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन
3. महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 320 कोरोनाबाधित रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 22 हजारांच्या पुढे, 24 तासात 265 रुग्णांचा मृत्यू
4. जगभरात मागील 24 तासात 2 लाख 82 हजार नवे कोरोनाबाधितांची नोंद, आतापर्यंत 6 लाख 82 हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू
5. देवेंद्र फडणवीस बडी आसामी, त्यांना डब्लूएचओही मार्गदर्शनासाठी बोलावू शकतं, मुख्यमंत्र्यांचा टोला, कोरोनाबाबत सरकार अपयशी ठरल्याची फडणवीसांची टीका
6. मिलिंद नार्वेकर यांनी जमिनीवर बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकली, सोशल मीडियावर नार्वेकर यांच्या फोटोची चर्चा
7. नागपुरात तूर्तास लॉकडाऊन लावला जाणार नाही, पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत फक्त कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन
8. मुंबईत येत्या 5 ऑगस्टपासून पाणी कपात, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 34 टक्के साठा, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
9. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल होताच रिया चक्रवर्तीला अश्रू अनावर, तर सुशांत आत्महत्या करु शकत नाही, अंकिताने मौन सोडलं
10. दिल्लीतील जेएनयूमधील उपस्थितीसाठी अभिनेत्री दीपिका पदूकोणला पाच कोटी रुपये मिळाले, रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांचा दावा