एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 ऑगस्ट 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात आतापर्यंत सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस, पावसाचा जोर सुरु असल्याने धरणंही भरली, पाच जिल्ह्यात मात्र तुरळक हजेरी
2. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाच्या वाढीव एफआरपीला मंजुरी मिळण्याची शक्यता, प्रतिटन 2750 एफआरपीला अमित शांहांच्या मंत्रिगटाची मंजुरी
3. एसटी महामंडळाकडून लवकर पेट्रोल-डिझेलची विक्री, इंडियन ऑईलसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी, आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महत्त्वाचं पाऊल
4. कोरोनातून बरं झाल्यानंतरही काहींना श्वसनाचा त्रास, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, टास्क फोर्समधील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असल्याचंही वक्तव्य
5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देता येणार नाही, राज्य सरकाराची हायकोर्टात माहिती
6. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सलमान कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याची माहिती
7. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी, तपास सीबीआय की मुंबई पोलिसांकडे यावर निर्णयाची शक्यता
8. माझ्या प्रकृतीसाठा प्रार्थना करा, अभिनेता संजय दत्तचं चाहत्यांना आवाहन, कॅन्सरवरील उपचारांसाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
9. क्रिकेटपटू रोहित शर्मासह पाच जणांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस, मराठमोळा पैलवान राहुल आवारेही अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत
10. मुंबईसह देशभरातील पंचतारांकित हॉटेल लवकरच सौरऊर्जेने चकाकणार, इंडियन हॉटेल कंपनी लिमिडेटचा टाटा पॉवरशी करार, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement