एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 18 मार्च 2019 | सोमवार | एबीपी माझा
1.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची कर्करोगाशी झुंज अपयशी, पणजीतल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, गोव्यावर शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली
2.मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पणजीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर
3.पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल, मुख्यमंत्रीपदासाठी पक्षनेतृत्वाकडून शोधाशोध, काँगेसकडून सत्ता स्थापनेचा दावा
4.माझ्या सल्ल्यानंतरच मोदी सरकारकडून एअरस्ट्राईक, चाकणमध्ये शरद पवारांचा खळबळजनक दावा, श्रेयवादाचं राजकारण उफाळण्याची शक्यता
5.माझी छाती 56 इंचांची नाही, पण माझ्या मनगटात दम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा
6.लोकसभेत मनसेचं इंजिन यार्डातच राहणार, निवडणूक लढवणार नसल्यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध, राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
7. रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकरांना युतीच्या मेळाव्याचं बोलावणं नाही, चौथ्या आघाडीच्या चर्चांना उधाण
8. राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र, रंगीत पीव्हीसी कार्डमध्ये बारकोडचा समावेश
9. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल बनणार, आज अधिकृत घोषणा होण्याची
10. शक्यता म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सोडत जाहीर होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement