एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 18 जानेवारी 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाराष्ट्राचे सरकार लेचेपेचे नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा, मदतीसाठी दुजाभाव करत असल्याचाही आरोप 2. मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पहिल्यांदाच कबुली, पक्षाचे निष्ठावान दुरावल्याचीही खंत 3. 26 जानेवारीपासून मुंबईत 24 तास हॉटेल्स, मॉल्स सुरु, आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफ संकल्पनेला तत्वतः मंजुरी, भाजपकडून टीकेचा सूर 4. इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी बेमुदत बंदची हाक, पाथरीला साईबाबांच्या जन्मभूमीचा दर्जा देण्याला विरोध, उद्यापासून भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता 5. कर्नाटक सरकारची बंदी झुगारत संजय राऊत आज बेळगावात धडकणार, अटक करुन दाखवण्याचं आव्हान, हुतात्म्यांच्या अभिवादनासाठी गेलेल्या राजेंद्र पाटील यड्रावरकरांची धरपकड 6. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण, मुरादाबामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचे संकेत, कायदा करण्याचीही मागणी 7. दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला गती मिळणार, बांधकामाला रेल्वे सुरक्षा आयोगाकडून अंतिम मंजुरी 8. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 11, 640 कोटी रुपयांचा निव्वळ नफा 9. राजकोटमधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी, तिसऱ्या आणि अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष 10. भारताचे माजी कसोटीवीर रमेशचंद्र उर्फ बापू नाडकर्णी यांचं मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन, शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार
आणखी वाचा






















