एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2020 | बुधवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली, काल दिवसभरात 150 नवीन रुग्णांची नोंद; तर गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
- कोरोना वाढता प्रसार पाहता 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार; एएनआयचं वृत्त
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित, 26 एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा तात्पुरती स्थगित
- कॅडिला हेल्थकेअर कंपनी कोरोना विषाणूवर लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु; सकारात्मक रिझल्ट आल्यास माणसांवर उपचाराकरिता उपलब्ध होणार
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात मध्यवर्ती पुण्यातील खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीपासून कर्फ्यू लागू; पोलीस आणि प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय
- मरकजवरून मुंबईत आलेल्या 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, महापालिकेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून कारवाई
- मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची मागणी तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा
- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण झाल्याची तरुणाची पोलिसांत तक्रार, आव्हाडांनी आरोप फेटाळले; तर जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या पंतप्रधानांना सूचना; मीडियाच्या जाहिराती बंद करण्याचा सल्ला, एनबीएची नाराजी
- कोरोनाचं जगातील संकट पाहता भारताचा मदतीचा हात; अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार, पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement